27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
HomeराजकीयCoronavirus : मोदी समर्थकांचा कळस : शिवराय, महात्मा गांधीं, डॉ. आंबेडकरांच्या कार्यासोबत...

Coronavirus : मोदी समर्थकांचा कळस : शिवराय, महात्मा गांधीं, डॉ. आंबेडकरांच्या कार्यासोबत ‘मेणबत्त्या इव्हेन्ट’ची तुलना

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ विषाणू ( Coronavirus ) अधिक फैलावत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांची एकजूट दाखविण्याकरीता आज ( रविवारी ) रात्री ९ मिनिटे मेणबत्ती, पणत्या लावण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. हा प्रकार ‘भंपक’पणा असल्याची जोरदार टीका देशभरातून होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर मेणबत्ती, पणत्या पेटविणे कसे योग्य आहे हे समजून सांगण्यासाठी मोदी समर्थकांनी चक्क शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याशी तुलना केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर, सुभाषचंद्र बोस यांनी केलेले कार्य उत्तुंग होते. या महापुरूषांनी केलेल्या कृती, आंदोलन, डावपेच यांच्या इतिहासात नोंदी झालेल्या आहेत. अशा उदात्त कार्याची ‘मेणबत्त्या इव्हेन्ट’सोबत कदापी तुलना होऊ शकत नाही. किंबहूना नरेंद्र मोदींच्या अखंड आयुष्यातील कार्याची सुद्धा या महापुरूषांसोबत तुलना होऊ शकत नाही. मात्र मोदी समर्थकांनी मेणबत्त्या इव्हेन्टचा फज्जा होऊ नये म्हणून या महापुरूषांसोबत तुलना करणारे संदेश व्हायरल केले आहेत.

शिवाजी महाराजांची ‘हर हर महादेव’ ही स्फूर्ती घोषणा, महात्मा गांधींजींचा मीठाचा सत्याग्रह व चले जाव आंदोलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चवदार तळ्याचे आंदोलन, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ ही घोषणा… अशा विविध नोंदी इतिहासात अजरामर झाल्या आहेत. या ऐतिहासिक नोंदींसोबत मोदी समर्थकांनी ‘दिवा लावण्याच्या’ कृतीची तुलना केली आहे. हे संदेश व्हॉट्सअपवर वेगाने व्हायरल होत आहेत.

सध्या देशावर ‘कोरोना’ व्हायरसचे ( Coronavirus ) संकट आहे. या संकटकाळात पंतप्रधान या नात्याने खमके धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार कोरोनाबाबत ( Coronavirus ) योग्य निर्णय घेत आहे. ठाकरे सरकारचा आदर्श मोदी सरकारने घेण्याची गरज आहे. पण असे निर्णय घेण्याऐवजी लोकांना भूलवण्यावर नरेंद्र मोदी यांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

विजेचे दिवे बंद करून मेणबत्त्या, पणत्या लावल्या तर त्यामुळे ‘कोरोना’चे ( Coronavirus ) संकट टळणार नाही. मेणबत्त्या, पणत्या पेटविण्यामागे कोणतेही वैज्ञानिक व वैद्यकीय कारण नाही. केवळ लोकांच्या मानसिकतेला अनुचित उत्तेजन देणे व आपली राजकीय पोळी भाजून घेणे हेच त्यामागील छुपे तर्कशास्त्र आहे. ‘मेणबत्त्या इव्हेन्ट’मधून हेच साध्य करण्याचा मोदी यांचा प्रयत्न दिसत आहे.

मोदी यांनी ‘मेणबत्त्या इव्हेन्ट’ची दोन दिवसांपूर्वी घोषणा केली होती. त्यानंतर देशभरातील वीज मंडळांच्या अभियंत्यांची तारांबळ उडाली. विजेची मागणी अचानक घटली तर विजेच्या संयंत्रामध्ये मोठा अनर्थ घडेल. वीज यंत्रणा ठप्प होईल. पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी आठवडाभर कालावधी लागू शकतो. हा धोका समोर दिसू लागला. त्याबद्दल वीज अभियंते, ऱाज्याचे ऊर्जा मंत्री यांनी स्पष्टीकरण जारी केले. हे स्पष्टीकरण जारी केल्यानंतर ‘मेणबत्त्या इव्हेन्ट’वर परिणाम होऊ शकतो याची धास्ती मोदी समर्थकांना वाटली असावी. त्यामुळेच या समर्थकांनी शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत तुलना करणारे मेसेज व्हायरल करायला सुरूवात केल्याचे दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

Covid2019 : विजेचे दिवे चालू ठेवूनच मेणबत्ती पेटवा : ऊर्जा मंत्र्यांचे आवाहन

MARKAJ : मुस्लिमांचं काय करायचं ? ( संजय आवटे )

Covid19 : ‘टाळ्या वाजवणे, दिवे लावायला सांगणे हे पंतप्रधानांचे काम आहे का ?’

‘कोरोना’बाबत केंद्र सरकारने जारी केलेली माहिती 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी